Search This Blog

Monday, September 4, 2017

अमेरिकेतील किराणा खरेदीचा अनुभव

हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती. भारतात असताना किराणा भाजीपाला अनेक वेळा आणला होता आणि आपल्याला इंग्लिश येतं त्यामुळे किराणा आणायला काही अडचण येणार नाही असं वाटत होतं . यादी तयार केली.  साधी यादी होती : कांदे, बटाटे, टोमॅटो आणि २-३ फळं.  पैसे घेऊन मी त्या दुकानात पोहोचलो.

यादीमध्ये  प्रथम सफरचंद घ्यायचे होते , मी लगेच फळाच्या विभागात गेलो आणि तिथे पाहतो तो काय  तिथे अनेक प्रकारची सफरचंद होती. गाला सफरचंद , फुजी सफरचंद , पिंक लेडी सफरचंद , एम्पायर सफरचंद , ग्रॅनी स्मिथ सफरचंद , फॉरचून सफरचंद ... आणि सगळीच  लाल होती. मला आपलं लाल सफरचंद आणि हिरवं सफरचंद एवढंच माहिती पण इथे सफरचंदाचे इतके प्रकार पाहून नक्की कोणतं घ्यायचं हा गोंधळ सुरु झाला. बरं ह्या प्रत्येक प्रकारात रेगुलर आणि ऑरगॅनिक हे आणि परत उपप्रकार ! ऑरगॅनिक घेण्याइतके पैसे मी आणले  नव्हते त्यामुळे ऑरगॅनिक घेण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी माझ्याजवळ ज्या regular सफरचंदाचा ढीग होता त्यातले काही घेऊन पुढे निघालो.

पुढचं फळ संत्र , तिथे गेलो तर परत तोच प्रकार !  नेव्हल संत्र , कॅलिफोर्निया संत्र , वेलेंसिया संत्र असे प्रकार आणि हे सर्व संत्रीच बरं , मोसंबी नव्हेत ! त्यातच अगदी संत्र्यासारखं दिसणार फळ पण clementine असं लिहिलं होतं , मला काहीच समजेना आणि त्याखेरीज शेजारी ग्रेपफ्रूट म्हणून होतं , ते थोडाफार आपल्या मोसंबीसारखं दिसत होतं त्यामुळे ते बाद , पण ह्या सगळ्या मधून नक्की कोणतं संत्र घ्यायचं ? भारतात हा  प्रश्न कधी पडला नव्हता कारण नुसत्या संत्र्यात इतके पर्याय असतात हेच कधी माहिती नव्हतं.  वास घेऊन बघितले तर कशालाच आपल्या संत्र्यासारखा वास येत नव्हता किंवा तिथे इतकी फळं होती कि तो वास बाकीच्या वासात दबून जात होता म्हणा किंवा मी गोंधळल्यामुळे मलाच वास ओळखता येत नव्हते म्हणा .असो कारण जे काही असेल , पण परत अंदाजाने त्यातल्या त्यात जास्ती नारिंगी दिसणार फळ हेच आपल्याला हवं असलेलं संत्र असावं अशी समजूत करून घेऊन ते फळ घेतले . अरे, काय त्रास आहे यार हा ? साधी संत्री घ्यायची तरी गोंधळ! आपल्याला फळं काय घ्यायची हे पण कळत नाहीये ह्याचा राग येऊ लागला. त्यामुळे आता फळं बास, आता थेट भाज्या घेऊ असं ठरवून मी भाज्यांच्या विभागात आलो.

लिस्ट मधील पुढची गोष्ट होती बटाटा.आता मी खुश झालो कारण बटाटा आपल्याला १००% ओळखता येतो आणि त्याला potato  म्हणतात हे आपल्याला माहित आहे ह्या जाणिवेने जरा बरं वाटलं आणि मग मी त्या भागात आलो आणि पाहतो तो काय ? इथेही नुसत्या बटाट्यांचे १७६० प्रकार !!! ईडाहो बटाटे , पांढरे बटाटे , सोनेरी बटाटे , लाल बटाटे , सॉल्ट बटाटे , बटर बटाटे , रुसेट बटाटे , बेबी बटाटे , मेडले बटाटे , जांभळे बटाटे , फिन्गरलिंग बटाटे , क्रीमेर बटाटे ... प्रकार संपेचनात ! आता काय करावे ? जांभळे बटाटे, लाल बटाटे वगैरे काही घ्यायचा प्रश्नच नव्हता पण उरलेल्या ह्या  पर्यायांमधून काय घ्यायचं हे ठरवणं आता अधिकच कठीण झालं होतं . परत आपलं अंदाजाने त्यातल्या त्यात आपल्या भारतातल्या बटाट्यांच्या जवळ जाणारी वस्तू घेऊन मी पुढे निघालो . आपण सहज किराणा घेऊन येऊ ह्या आत्मविश्वासाला चांगलाच तडा गेला होता.

पुढचा पदार्थ टोमॅटो ... आता इथे काय बघायला मिळतंय अश्या विचाराने थोड्या साशंक मनानेच मी तिथे गेलो आणि परत तेच . बेबी टोमॅटो  , रोमा टोमॅटो  , बीफस्टिक टोमॅटो  , स्नॅकिंग टोमॅटो  , vine टोमॅटो  , कॉकटेल टोमॅटो  , चेरी टोमॅटो  , झीमा टोमॅटो  , ग्रीनहाऊस टोमॅटो  , प्लम टोमॅटो  , लोकली ग्रोन टोमॅटो  , हॉट हाऊस टोमॅटो  , कुमाटो टोमॅटो  .... आणि बरेच काही .. अरे काय चाललंय काय ? साधे टोमॅटो घ्यायचेत .. मला आपलं लाल टोमॅटो आणि हिरवे टोमॅटो (कच्चे ) इतकच माहिती. ह्या एवढ्या प्रकारातून आता कोणता टोमॅटो निवडावा हा प्रश्न अभिकच भेडसावू लागला ? बर कोणाला विचारावं तर नक्की काय विचारायचं ? भारतात  मिळतो तो टोमॅटो कोणता ? काही कळत नव्हते , फक्त प्रत्येकाच्या निरनिराळ्या किमती मात्र दिसत होत्या . पुन्हा अंदाजानेच टोमॅटो घेतले.  माझ्याकडे असलेल्या पैशात उत्तम क्वालिटीचं आणि चवीचं काय मिळेल , आपण जे घेतलय ते कसं लागतं असेल ह्यामुळे माझा गोंधळ उडाला.

साधी यादी होती : कांदे, बटाटे, टोमॅटो आणि २-३ फळं . भारतात असताना १० मिनिटात हे मी घेऊन आलो असतो पण इथे गेले तासभर मी फिरत होतो आणि समोर वस्तू दिसत असून, इंग्लिश येत असून, खिशात पुरेसे पैसे असून आपण घेतलय हे नक्की आपल्या हवय तेच आहे का ह्याचा भरवसा नव्हता . खरंच व्यावहारिक अनुभव आणि पुस्तकी अनुभव ह्यात काय फरक आहे हे मला त्या दिवशी चांगलंच कळून चुकलं. आणि प्रत्येक गोष्टीत इतके पर्याय असणं सोयीचं कि गोंधळ वाढवणारं ? हा प्रश्न पडला.

आता झाला इतका गोंधळ पुरे झाला असे म्हणून मी बिल करायला गेलो. इथे गेल्यावर काउंटरवरील मुलीने बिल केले आणि म्हणाली " Do you want any cash back? "  मी विचार केला अरे वा , काहीतरी कॅश बॅक ऑफर दिसतीये, नाकारायचा प्रश्न येतोच कुठे ? बरं झालं , इतक्या सगळ्या गोंधळानंतर हि एक गोष्ट तरी चांगली होतीये , पैसे परत देतीये हि मुलगी , पण असं विचारतीये का ही ? कोण नको म्हणेल कॅशबॅक ला ? असेल काही तरी २%, ५% कॅश बॅक ऑफर असा विचार करून मग मी म्हटलं "येस " , तिचा परत प्रश्न " How much ? " मला काहीच लक्षात येईना, मी विचार केला हि आपल्यालाच काय विचारतीये किती पाहिजेत म्हणून ? मला मस्त १००% पैसे परत मिळावे असं वाटेल पण देणार आहेत का ? जास्तीत जास्त किती पैसे देता येतील तितके द्या ना .. मग मी म्हटलं थोडा अंदाज घ्यावा  "How much can I get ? " ह्यावर तिचे परत तेच " As much as you want, upto $100 " मी आधीच भाज्यांच्या निवडीमुळे गोंधळलेलो आणि त्यात हे काही तरी नवीनचं ! माझं बिल जर $२० च्या आसपास झालंय तर हि मुलगी मला $१०० कॅशबॅक का म्हणून देईल ? मग माझ्या लक्षात आलं कि हे प्रकरण आपण समजतोय तसं नाहीये , काही तरी वेगळंच आहे.  मग मी तिलाच विचारलं कि नक्की हा कॅशबॅक प्रकार काय आहे ? माझ्यामागे अजून बरेच लोक बिलिंग साठी उभे होते आणि मी बराच वेळ कॅश बॅक प्रकार काय हे समजून नादात त्यांना नक्कीच वैताग दिला असणार.  शेवटी मला कळले कि कॅश बॅक म्हणजे समजा तुमचे बिल $३० झाले आहे आणि तुम्ही कार्डने पैसे देणार असाल आणि तुम्हाला काही कॅश हवीये (म्हणजे कॅश साठी परत ATM मध्ये जायला नको) , तर तुम्ही त्यांना सांगू शकता कि $२० कॅश बॅक ... म्हणजे ते लोक तुमच्या कार्ड वर $५० चा चार्ज लावतात आणि तुम्हाला $२० कॅश मध्ये परत देतात ! मी मुळातच कॅश देणार असल्याने खरंतर मला तसा कॅशबॅकचा काहीच उपयोग नव्हता पण केवळ अज्ञानापोटी मी त्या काउंटरवरील मुलीचा आणि माझ्या मागे उभ्या असलेल्या अनेक माणसांचा वेळ वाया घालवून शेवटी निघालो.

त्या दुकानातील सगळ्यांच्या नजरा चुकवत, झालेला गोंधळ मागे टाकत मी जितक्या वेगाने येत येईल तितक्या वेगाने रूमवर परत आलो आणि मग किचनमध्ये जाऊन आणलेलं जे आहे ते रूममेटला दिलं . त्यानेही त्याला वाटत असलेला रस्सा बनवला आणि चव घेतल्यावर लक्षात आलं कि हा कांदा बटाटा रस्सा होण्याऐवजी वेजिटेबल सूप झालेलं आहे !! आणि सफरचंद सोडून आपण काहीच योग्य ते आणलेलं नाहीये. मग काय ? रूममेटला झालेली फजिती सांगता सांगता त्या दिवशीचा बेत रस्सा आणि भात ह्यावरून व्हेजिटेबल मेडले सूप आणि ब्रेडवर कधी गेला हेच कळलंच  नाही ! 


Sunday, September 18, 2016

घरचा भेदी



मुंबईच्या ताज हॉटेलमधील ती डीनर पार्टी चांगली रंगली होती. कारणही तसेच होते. नॅशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शामकुमार यांच्या युनिटने उपग्रहातून जमिनीवरील हालचाली अधिक क्षमतेने आकलन करेल असे प्रोटोटाईप यशस्वीरीत्या तयार केले होते आणि त्यांना भारत सरकारकडून पुढील कामासाठी फंडिंग पण मंजूर झाले होते. आज त्यांच्या युनिटचे हे यश साजरे करण्यासाठी सर्वजण जमले होते. शामकुमार यांनी एक छोटेखानी पण छान भाषण केले आणि टीम मधील सर्वांचे आभार मानून ते घरी जाण्यासाठी निघाले. शामकुमार हे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी आणि रिसर्चचे  सर्वेसर्वा. गेले काही महिने त्यांनी रिसर्चमध्ये स्वतःला अगदी झोकून दिले होते.  गाडीतून जाताना गेले १५ महिने किती कष्ट घेतले हे त्यांना आठवत होते आणि ह्या यशाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी असे त्यांना वाटले. आता रात्र बरीच झाली होती आणि दुसऱ्या दिवशी शनिवार (सुट्टी) त्यामुळे घरी पोहोचल्यावर समाधानाने त्यांनी पाठ टेकली.

 सकाळी सकाळी त्यांच्या मोबाईल वाजला. आश्चर्य अधिक चिडचिड अश्या भावनेने त्यांनी फोन उचलला. फोन त्यांच्या ऑफिसमधून होता. फोन वरून त्यांनी जे ऐकलं ते ऐकून त्यांची उरलीसुरली झोप खाडकन उडाली. "तू काही करू नकोस,  मी आलोच" असे सांगून त्यांनी घाई गडबडीने फोन ठेवला आणि पटकन कपडे घालून बाहेर जायला निघाले. अर्ध्या तासात ते ऑफिसला पोहोचले.  सिक्युरिटी डेस्कवर असलेल्या केशवने धावत जाऊन त्यांना सांगितले कि प्रोटोटाईप चोरीला गेला ! शामकुमारच्या पायाखालची जमीनच सरकली . कालपासून केशवच ड्युटीवर होता.  आज सकाळी नेहमीच्या राऊंडला जाताना त्याला लक्षात आलं कि प्रोटोटाईप चोरीला गेला आहे . शामकुमारचे आता डोके गरगरायला लागलं. कोणी चोरला कसा चोरला, शत्रूच्या हातात जर हा प्रोटोटाईप पडला तर अनर्थ होऊ शकतो हे त्यांनी पटकन ताडले आणि  लगेच पोलीस सबकमिशनर पाटील ह्यांना फोन लावला. कालच्या पार्टीत ते सुद्धा होते.  फोनवर सगळी परिस्थती सांगताच त्यातील गांभीर्य पाटील यांच्या लक्षात आलं . हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न होऊ शकतो हे त्यांनी झटकन ताडलं तेंव्हा ह्या प्रकरणाचा गवगवा होऊ देण्यात अर्थ नव्हता. प्रकरण अतिशय गोपनीयतेने हाताळावे लागणार होते. पाटील ह्यांनी त्या भागातील इनचार्ज असणाऱ्या इन्स्पेक्टर कदमला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली आणि हातातील बाकी सर्व केसेस सोडून फक्त ह्या प्रकरणावर लक्ष द्यायला आदेश दिले. कदम आपल्या नेहमीच्या स्टाफसह  घटनास्थळी आले आणि त्यांनी बॅरिकेट्स टाकून लोकेशन सील केले. घटनास्थळाची त्यांनी बारकाईने तपासणी करायला सुरवात केली. कुठेही कसलीही तोडफोड दिसत नव्हती . ह्याचा अर्थ साफ होता कि चोराला ह्या जागेची पूर्ण माहिती होती आणि प्रोटोटाईप ठेवलेल्या जागेपर्यंत तो सहज पोहोचू शकला . त्यांनी केशवला ताब्यात घेऊन काल रात्री काय काय घडलं ते विचारायला सुरवात केली. केशव नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ड्युटीवर आला होता . त्याला हॅन्डओव्हर देऊन त्याच्या आधीचा गार्ड संदीप निघून गेला . आल्याबरोबर केशवने नेहमीप्रमाणे त्याचा राऊंड मारला. त्यावेळी प्रोटोटाईप नेहमीच्या खोलीत होता हे केशवने अगदी शपथेवर सांगितलं. साधारण रात्री १२:३० च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे हे केशवने CCTV मध्ये पाहिल आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हतं . थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला . पहाटे ४ ला तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला . इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरवात केली पण पाहतात तर काय ! १२ ते १२:५५ ह्या  कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते ! ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, केशवच्या ती ४ वाजता लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही तर CCTV फुटेजपण डिलिट केले होते . ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हे देखील माहिती होते . म्हणजेच चोर हा कोणीतरी कंपनीतीलच असण्याची शक्यता आहे असा अंदाज इन्स्पेक्टर कदमनी  बांधला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी तात्काळ संदीपला ताब्यात घेण्यासाठी कुमक पाठवली . संदीप त्याच्या बायकोबरोबर कुठे तरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करून लगेच इन्स्पेक्टर कदम यांच्या समोर हजार करण्यात आलं . संदीपला त्यांनी काल रात्री काय काय केलंस ते सांग असं म्हटल्यावर संदीपने सांगितलं कि काल त्याची ड्युटी संपल्यावर तो घरी गेला आणि आज त्याचा त्याच्या बायकोबरोबर कर्नाटकात जायचा बेत होता. त्याच्या बायकोने तिथे कुठल्याश्या देवाला नवस बोललेला होता आणि त्याकरिता म्हणून ते दोघे बाहेर जायला निघाले होते आणि तितक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर कदमनी संदीपच्या बायकोला वेगळ्या खोलीत घेऊन जाऊन पुन्हा तेच प्रश्न विचारले . तिनेही आमचे हे ड्युटी संपवून परत आले आणि उद्या लवकर उठ आपल्याला जायचे आहे असे सांगून झोपले असे तिने सांगितले . साधारण किती वाजता संदीप घरी आला असं विचारताच तिने साधारण १:३० वाजला असेल असं सांगितलं. संदीपची ड्युटी तर ११ ला संपते मग १:३० वाजेपर्यंत तो काय करत होता असे संदीपला विचारले तेंव्हा त्याने ओशाळून सांगितले कि तो घराजवळच्या बारमध्ये जाऊन दारू पीत बसला होता आणि त्यामुळे त्याला यायला वेळ झाला . हे ऐकताच संदीपची बायको त्याचा तिथेच उध्दार करू लागली. "तरी मला वाटलंच दारूचा वास येतोय, उद्या देवाला जायचंय, काही काळ वेळ आहे कि नाही, इतका प्रवास आहे उद्या, मी इथे घरी वाट बघतीये, कशाचा काही नाही ह्यांना इ . इ ." संदीप शरमेने चूर झाला होता . इन्स्पेक्टर कदमनी तिला शांत केले आणि दोघांना दुसऱ्या खोलीत थांबायला सांगितले. मग  इन्स्पेक्टर कदम यांनी ती इमारत आणि त्याचा परिसर पूर्ण पिंजून काढला पण काहीच मिळाले नाही. अगदी शेवटी त्यांना इमारतीच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका ट्रॅश मध्ये एक वरील कव्हर फुटलेला असा युसबी पेन ड्राईव्ह मिळाला. त्यांनी घाई घाईनी तो कॉम्प्युटर ला जोडला तेव्हा तो करप्ट आहे असा मेसेज कॉम्प्युटरवर आला.

आता काय करावे हे इन्स्पेक्टर कदमना सुचेना. त्यांनी विचार करायला सुरवात केली . एकच इमारत, त्यातून आत येण्यासाठी हा दरवाजा, आल्या आल्या फ्रंट डेस्क , तिथे एक कॉम्पुटर आणि तिथेच गार्ड बसतो. इमारतीत कुठेही जायचे असल्यास गार्ड समोरूनच जावे लागते. रात्रीची वेळ त्यामुळे ऑफिसमध्ये कोणी कर्मचारी नाही , कुठेही तोडफोड अगर मोडतोड नाही. अगदी अलगद प्रोटोटाईप चोरीला गेला होता आणि बरोबर फुटेजदेखील . मिळाला तो फक्त एक युसबी ड्राईव्ह जो उपयोगाचा नाहीये. केशवला आणि संदीपला तर ताब्यात घेतले आहे पण दोघेही काहीच सांगत नाहीयेत. शिवाय त्यांच्याविरुध्द्व असे काही पुरावे पण मिळत नाहीयेत .  पाटील साहेबांचा फोन आल्यावर काय सांगायचे आता ? मदतीसाठी आणखी कुमक पण मागवता येत नाहीये कारण ही केस गुप्तपणे हाताळण्याचे आदेश आहेत . जसा जसा वेळ जात होता तस चोराला पकडणे कठीण होत जाणार हे स्पष्ट दिसत होतं . ह्यात चोराने तो प्रोटोटाईप देशाच्या शत्रूला विकला तर ? शत्रू तर हवी तेवढी किंमत देऊन ते विकत घेईल. आणि असा खरोखर झाल तर भारताच्या सुरक्षिततेला एक मोठे आव्हान निर्माण झाले असते.  कदम यांच्या आयुष्यातील ही सर्वात क्रिटिकल केस होती. त्यांच्या डोळ्यात निराशा दाटून आली . आता काय करावे हा विचार करत असतानाच कदम यांचा फोन वाजला . त्यांनी फोन उचलताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना. पलीकडून थेट दिल्लीहून भारताचे संरक्षण मंत्री श्री. भट  बोलत होते ! कदम क्षणभर जागेवरून उडालेच , पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बोलायला सुरवात केली. पाटील साहेब आणि त्याच्या वरिष्ठांकडून प्रकरण कळल्याचे भट ह्यांनी सांगितले . भट ह्यांनी हे प्रकरण किती महत्वाचे आहे हे कदम ह्यांना पुन्हा एकदा सांगितले आणि हे गोपनीय ठेवण्याविषयी आदेश दिले परंतु त्याच बरोबर मदत करायची देखील तयारी दाखवली. स्वतःचा थेट फोन नंबर दिला आणि पुढे काय करणार आहे असा विचारल. कदम यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हतेच . केशव आणि संदीपला ताब्यात घेतले आहे आणि एक युसबी मिळाला आहे इतकच ते बोलले . बोलता बोलता त्यांना आपला  कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र विश्वजीत म्हणजेच जित्या ची आठवण झाली. कदाचित तो ह्या प्रकरणात आपल्याला मदत करू शकेल असे त्यांना वाटले. कदमनी श्री भट यांना विश्वजीतबाबत सांगितले आणि त्याला ह्या केस मध्ये सहभागी करण्याविषयी सुचवले . भट यांना ह्या केस मध्ये जितकी कमी माणसे गुंततील तितके हवे होते. कदमनी पूर्ण परिस्थिती सांगितली आणि सध्या विश्वजीत ची मदत घेण्यावाचून पर्याय नाही हे निक्षून सांगितल्यावर श्री भट यांनी तशी परवानगी दिली पण विश्वजीतला गोपनीयतेची शपथ देणे आणि आणखी कोणालाही सामील करायचे असल्यास प्रथम श्री भट यांना सांगणे ह्या बोलीवरती ! श्री भट यांच्याशी फोन होताच क्षणभर कदम यांनी आपल्या कपाळावरील घाम टिपला. ताण असह्य होत होता . एक ग्लास पाणी प्यायल्यावर मग जरा त्यांना जरा बरे वाटले. लगेच त्यांनी कॉम्पुटर फॉरेन्सिक एक्सपर्ट जित्या ऊर्फ विश्वजीतला फोन लावला .

विश्वजीतची स्वारी आज शनिवार सकाळ म्हटल्यावर अजून बेडमध्येच होती.  इकडे इन्स्पेक्टर कदमचे ३ फोन येऊन गेले आणि विश्वजितला ह्याचा पत्ताच नव्हता. आता शेवटचा प्रयत्न नाहीतर थेट विश्वजीतच्या घरी जायचं असा ठरवून कदमनी पुन्हा फोन केला . विश्वजितने आळसावलेल्या आवाजात फोनउचलला . कदमनी तुझ्या मदतीची गरज आहे, ताबडतोब नॅशनल इन्स्टिट्यूटला निघून ये असं सांगितल्यावर त्याने चक्क नाही म्हणून फोन ठेवून दिला . कदमची तळपायाची आग मस्तकात गेली . पण रागावरती नियंत्रण ठेवून त्यांनी पुन्हा विश्वजीतला फोन लावला  आणि आर्जवे करत आपल्या दोस्तीची शपथ घातली . विश्वजीतची स्वारी शेवटी कुरकुरत उद्याच्या रविवारी रात्री मस्त जेवण आणि डबल ब्लॅकचा खंबा देण्याच्या बोलीवर तयार झाली .

विश्वजीत आपल्या फॉरेन्सिक किटसह नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आला. इन्स्पेक्टर कदम त्याचीच वाट बघत होते . येताच काही मिनिटात कदमनी परिस्थिती विश्वजीतला सांगितली आणि त्याबरोबर भारत सरकारचे आपल्याला पूर्ण पाठबळ आहे हे देखील सांगितले . विश्वजीतने तो युसबी ताब्यात घेतला आणि फ्रंट डेस्कच्या कॉम्पुटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली. बाजूच्या खोलीत त्याने माहितीच्या पृथ्थकरणासाठी फॉरेन्सिक टूल्स सेट केली आणि तो सांगेपर्यंत अजिबात डिस्टर्ब करायचे नाही असे सांगितले  . फॉरेन्सिक ऍनालिसिस प्रोग्रॅमने विश्वजीतच्या शक्तिशाली कॉम्प्युटरच्या साहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करायला सुरवात केली.

सर्वात प्रथम विश्वजीतने शोधून काढले कि ह्या कॉम्पुटरवर ४ युजर्स आहेत. संदीप, केशव आणखी दोघे जण. म्हणजे ४ जणांमध्ये हा कॉम्पुटर वापरला जात होता. विश्वजीतने विचारणा केली असता कळले कि इतर दोघे २ दिवस सुट्टीवर आहेत त्यामुळे केशव आणि संदीपचं आलटून पालटून ड्युटी करत आहेत . मग विश्वजीतने सिस्टिमची लॉगइन इन्फॉर्मशन चेक करायला सुरवात केली आणि बिंगो ... १२:३३ ला संदीपच्या प्रोफाइल ने लॉगइन केलेले दिसत होते. आणि १२: ५५ ला लॉगऑऊट ! ह्यामुळे संदिपवरचा संशय बळावला पण संदीपचा अकॉउंट वापरून दुसऱ्या कोणीतरी देखील लॉगइन केलं असण्याची शक्यता होती त्यामुळे विश्वजीतने आणखी  विश्लेषण करायला सुरवात केली . त्या मोडक्या युसबी ड्राईव्हवरून माहिती रिकव्हर करण्यात विश्वजीतला यश आले. त्या युसबी मध्ये फक्त एक फाईल होती ज्यात एक की आणी पासवर्ड होता. विश्वजीतने  त्याच्या अनुभवावरून ताडले कि हा बिटलॉकरचा पासवर्ड आहे . बिटलॉकर हे सॉफ्टवेअर पार्टीशन एनक्रिप्ट करायला वापरले जाते हे त्याला माहित होते . त्याने लगेच ह्या कॉम्पुटर मध्ये बिटलॉकरशी संबंधित पार्टीशन आहे का हे पाहायला सुरवात केली पण थोड्या वेळातच त्याला कळले कि अशी कोणतीही माहिती अगर पार्टीशन कॉम्पुटरवर नाहीये . ह्याचा अर्थ नक्कीच एखादा दुसरा कॉम्पुटर आहे ज्याचा हा बिटलॉकर पासवर्ड आहे .पण असा दुसरा कॉम्पुटर कोणता? विश्वजीतने आणखी माहिती शोधायला सुरवात केली .

त्याने संदीपचे ई-मेल चेक करायला सुरवात केली. बरेच शोधल्यावर त्याला असे लक्षात आले कि सॅमन्था म्हणून कोणी तरी आहे जिने संदीपला अनेकदा भेटायला बोलावले आहे. थोडी चौकशी केल्यावर लक्षात आले कि सॅमन्था हि त्याच कंपनीत टेकनिकल विभागात कामाला आहे. मग विश्वजीतने संदीप आणि सॅमन्था ह्या दोघांमधील इमेल्स चेक करायला सुरवात केली . काही इमेल्स हे संशयास्पद होते ज्यात सॅमन्थाने तुझी आता आयुष्यभराची चिंता दूर  होईल, तुला तुझे भाग्य उजळवायचे आहे का ? अशी विचारणा केली होती. ह्यावरून विश्वजीतचा संदिपवरील संशय अधिक पक्का झाला आणि आता पुरेसा पुरावा देखील हातात होता . त्याने लॉगइन ची माहिती आणि ते इमेल्स ह्यांची प्रिंट काढून इन्स्पेक्टर कदमना माहिती दिली. कदम ह्यांच्याकडे आता पुरेशी माहिती आली होती आणि आता त्यांच्या डोळ्यातील निराशेची जागा एकदम नव्या उमेदीने घेतली .  कदम यांनी संदीपला एका खोलीत बोलावले आणि काल  रात्री काय झाले हे पुन्हा खडसावून विचारले. संदीपने आधीचीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरवात केल्यावर इन्स्पेक्टर कदम यांनी संदीपच्या २ श्रीमुखात भडकावल्या आणी त्याच्या समोर इमेल्सच्या प्रिंट आऊट आणि  लॉगइनची माहिती ठेवत पुन्हा खडसावून विचारले आणि खोटं बोलल्यास किती वाईट परिणाम होऊ शकतात ह्याची धमकी दिली . तेंव्हा संदीप पोपटासारखा बोलू लागला.

 सॅमन्था हि अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाची स्त्री होती. ड्युटीवर असताना संदीप तिला रोज बघायचा.तिच्यावर खरे तर तो फिदाच होता.  काही आठवड्यांपूर्वी सॅमन्थाने संदीपशी ओळख वाढवली. तिने त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले होते . तिथे तिने प्रोटोटाईप चोरून तिच्या स्वाधीन करण्याची कल्पना त्याला दिली. त्याबदल्यात खूप मोठी रक्कम देण्याचे कबूल केले. तिचे ते सौंदर्य, मधाळ आवाज आणि भली मोठी रक्कम ह्या सर्वांनी संदीपला भुरळ घातली. रक्कम इतकी मोठी होती कि इथून पुढे संदीप आरामात बसून खाऊ शकला असता . सॅमन्थासाठी संदीपने हे कबूल केलं आणि त्या दिवशी ड्युटी संपल्यावर तो बाजूच्याच बार मध्ये दारू पीत बसला. ठरल्याप्रमाणे सॅमन्था १२ वाजता आली आणि ते दोघे कंपनीकडे जायला निघाले. लांबून केशववर संदीप लक्ष ठेवून होता आणि एक घोगडें पांघरून मागच्या पार्किंगच्या तिथे सॅमन्थाने खुडबूड सुरु केली. अपेक्षेप्रमाणे केशव तिकडे यायला निघाला तेंव्हा संदीपने सॅमन्था ला मिस्ड कॉल दिला आणि लगेच इमारतीत प्रवेश करून प्रोटोटाईप चोरला, फ्रंट डेस्कच्या कॉम्पुटरवर लॉगिन केले आणि CCTV फुटेज डिलिट केले, लॉगऑऊट करून केशव यायच्या आत तिथून पोबारा केला. इकडे संदीपचा मिस्ड कॉल आल्यावर सॅमन्था ने देखील पोबारा केला. केशव तिकडे येत असल्याची हि खूण होती. संदीप आणि सॅमन्था ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि संदीपने तो प्रोटोटाईप सॅमन्थाला दिला आणि त्या बदल्यात मिळणारी निम्मी रक्कम सॅमन्थाने त्याला दिली आणि उरलेली उद्यापर्यंत त्याच्या कर्नाटकातील पत्त्यावर पोहोचेल असे सांगितले. खर्चाला थोडे पैसे संदीपला देऊन आणि प्रोटोटाईप  घेऊन सॅमन्था निघून गेली आणि संदीप घरी आला. नवस पूर्ण करण्याच्या बहाण्यानं कर्नाटकात जायचे आणि पूर्ण पैसे मिळाले कि दक्षिणेच्या एखाद्या राज्यात कायमचे जाण्याचा विचार संदीपचा होता. सॅमन्था कुठे गेली असेल काय करेल ह्याचा मात्र संदीपला अजिबात अंदाज नव्हता.
इन्स्पेक्टर कदम यांना पहिल यश मिळालं ते म्हणजे चोर सापडला पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटोटाईप अजून मिळाला नव्हता . त्यांनी लगेच पाटील ह्यांना हि सर्व माहिती दिली आणि पुढील तपासाला सुरवात केली. सॅमन्थाच्या घराला कुलूप होतं आणि फोन स्विच ऑफ येत होता. शेजारी चौकशी केली असता ती कालपासूनच घरी आलेली नाही असं कळलं.               

विश्वजीतला आता सॅमन्थाच्या ऑफिसमधील कॉम्पुटरचा ऍक्सेस देण्यात आला. विश्वजीतने आता सॅमन्थाच्या कॉम्पुटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली आणि माहितीचे विश्लेषण करायला सुरवात केली. सर्व प्रथम त्याने सॅमन्थाचे इमेल्स चेक करायला सुरवात केली. तिच्या कॉम्पुटरवर जवळ जवळ १,२०,००० इमेल्स होते. आणि तिने जवळ जवळ ४३ जणांशी ई-मेल संभाषण केले होते. आता इतक्या इमेल्स मधून हवा तो ई-मेल कसा शोधून काढायचा ? विश्वजीतने त्याच्या फॉरेंसिकच्या अनुभवाचा वापर करायला सुरवात केली. प्रथम त्याने टाइम लाईन ठरवली आणि फक्त गेल्या ६ महिन्यातील इमेल्सवर भर द्यायचे ठरवले. त्यामुळे एकूण इमेल्स राहिले ४०,०००. मग त्याने संदीप आणि सॅमन्था ह्यांच्यातील इमेल्स चा बारकाईने अभ्यास करायला सुरवात केली आणि काही कीवर्ड शोधून काढले. मग त्या ४०,००० इमेल्स मधून त्या  कीवर्डशी संबंधित असे जवळ जवळ २०० इमेल्स मिळाले आणि त्यात त्याला कळले कि सॅमन्था निकी नावाच्या व्यक्तीशी प्रोटोटाईप संदर्भात बोलत आहे. विश्वजीतने मग सॅमन्था आणि निकी ह्यांच्यातील इमेल्स वर लक्ष द्यायला सुरवात केली.आणि ते इमेल्स वाचून त्याला कळले कि निकीदेखील ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. निकी हा कंट्रोलिंग युनिटचा प्रमुख होता आणि त्याचे आणि सॅमन्थाचे जवळचे संबंध होते. निकी आणि सॅमन्थाच्या इमेल्स मध्ये हे कळून चिकले कि निकीने सॅमन्थाला " ते टोकन " पाठव असे सांगितले होते आणि त्या नंतर आपले स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ येत आहे , टोकन आवडले आता मुख्य पाककृती ची वेळ जवळ आली अश्या पद्धतीचे इमेल्स पाठवले होते. मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप हे जवळ जवळ निश्चित होते पण टोकन म्हणजे काय ? ह्याचा अर्थ आणखी काही तरी चोरीला गेले आहे काय ? ते कदाचित प्रोटोटाईपशी निगडित असेल काय ? हा विचार आता विश्वजितच्या डोक्यात सुरु झाला आणि तितक्यात त्याला त्या युसबीची आठवण झाली. त्याने सॅमन्थाच्या कॉम्पुटरवर पहिले तर त्याला अनअलोकाटेड सेक्टर्स आढळून आले . घाईघाईने सॅमन्थाच्या कॉम्पुटरवरील अनअलोकाटेड सेक्टर्स रीकॉन्स्ट्रक्ट केले आणि युसबी वरील बिटलॉकर पासवर्ड टाकला आणि बिंगो ! तिच्या कॉम्पुटर वरील डिलिट केलेल्या पार्टीशनवरील डेटा आता दिसू लागला. विश्वजीतने तपासमधील एक अतिशय महत्वाची पायरी गाठली होती. तो आता रिकव्हर केलेल्या पार्टीशनवरील डेटाचे विश्लेषण करू लागला. तिथे त्याला scan.file  अशी एक फाईल दिसली जिला पासवर्ड देऊन एनक्रिप्ट केलं होतं . आता २ गोष्टी गरजेच्या होत्या , हि फाईल कशी एनक्रिप्ट केली (कोणता प्रोग्राम वापरून ) आणि पासवर्ड काय असेल ? ज्या अर्थी फाईल एनक्रिप्ट केली त्या अर्थी एखादे एनक्रिप्ट करणारे सॉफ्टवेअर नक्की ह्या कॉम्पुटर वर असले पाहिजे. विश्वजीतने प्रोग्रॅम फाइल्स चेक करायला सुरवात केली तर तिथे एनक्रिप्ट करणारे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते . त्याने इतर कोणते प्रोग्रॅम्स (standalone ) होते हे चेक केले पण तिथेही काही संशयास्पद नव्हते. विश्वजीतने आता आपले फॉरेंसिकचे ज्ञान पणाला लावले. विंडोजच्या रेजिस्ट्री मध्ये जाऊन त्याने चेक करायला सुरवात केली. आणि तिथे त्याला एक लिंक फाईल दिसली ज्यामुळे हे कळलं कि डेस्कटॉप वरील काही आयकॉन्स डिलीट केले गेले आहेत . विश्वजीतने मग रिकव्हरी प्रोग्रॅम सुरु केला आणि डिलिट केलेला डेटा परत मिळवला . त्यात त्याला असे दिसून आले कि तिथे Truecrypt नावाचे सॉफ्टवेअर होते जे डिलीट करण्यात आले आणि हे सॉफ्टवेअर डेटा एनक्रिप्ट करायला वापरतात. चला म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कि हि फाईल Truecrypt वापरून एनक्रिप्ट करण्यात आली आहे , पण पुढे काय? पासवर्ड कसा मिळवणार ? पासवर्ड क्रॅक करणाऱ्या सॉफ्टवेअरला ती एनक्रिप्टेड फाईल दिली असता पासवर्ड हा कॉम्प्लेक्स आहे आणि हा क्रॅक करायला ७ दिवस लागतील असा संदेश आला . साहजिकच तितका वेळ विश्वजितकडे नव्हता . त्याने पुन्हा निकी आणि सॅमन्था ह्यांच्यातील संभाषणावर लक्ष द्यायला सुरवात केली , कदाचित तिथे काही क्लू मिळेल ?

त्या दोघांच्या संभाषणात अनेकदा बाहेर जेवायला जाण्याचे इमेल्स होते. बऱ्याचदा ते इटालिया ह्या हॉटेल मध्ये जातात हे विश्वजीतला कळले . सॅमन्थाला Alfredo पास्ता खूप आवडतो हे हि तिने ई-मेल मधून निकीला सांगितले होते . बरयाचदा ती Alfredo च्या उल्लेख my favorite असा करत असे. विश्वजित अक्षरशः डोळ्यात तेल घालून प्रत्येक ई-मेल वाचत होता आणि त्याला अचानक एक ई-मेल मिळाला ज्यात निकीने सॅमन्थाला टोकन मिळाले, धन्यवाद आणि टोकन खूप आवडले असा उल्लेख केला होता आणि त्या बरोबरच टोकन सुरक्षित ठेव असा सल्ला पण सॅमन्थाला दिला होता . त्यावर सॅमन्थाने काळजी नको निक , इट इस my favorite असा रिप्लाय दिला होता. विश्वजीतच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली आणि त्याने चटकन truecrypt त्याच्या कॉम्पुटरवर इन्स्टॉल केले आणि ती फाईल उघडून Alfedro, AlfredoPasta , Alfrdo_Pasta ,alfredoPasta PastaAlfredo असे कॉम्बिनेशन पासवर्ड म्हणून वापरून पहायला सुरवात केली आणि  बिंगो.... त्यातील एका पासवर्डने फाईल ओपन झाली. ह्यात नशिबाचा भाग खूप होता पण म्हणतात ना कि प्रयत्न करणाऱ्याला नशिबाची साथ असते !खालील फोटो त्या फाईलमध्ये होते . प्रोटोटाईपच्या ह्या ब्लूप्रिंट होत्या.  टोकन म्हणजे ह्या ब्लूप्रिंट्स आणि मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप हे कळले. ह्या ब्लूप्रिंट्स सॅमन्थाने निकीला पाठवल्या होत्या. 






विश्वजीतने आता मोर्च्या निकीच्या ऑफिसकडे वळवला. तिच्या ऑफिस मधील कॉम्प्युटरचे आता फॉरेन्सिक ऍनालिसिस करायला त्याने सुरवात केली . सुरवातीलाच त्याने प्रोटोटाईप आणि त्याच्या संबधीचे इमेल्स ह्यावर लक्ष द्यायला सुरवात केली. तेव्हा त्याला असे लक्षात आले कि स्वित्झलँड मधील स्टारलाईट कंपनीच्या CEO नी म्हणजे निकोलसनी निकीकडे प्रोटोटाईप विषयीची ऑफर दिली होती. निकीने त्याला आश्वासन दिले आणि टोकन देण्याच्या मोबदल्यात म्हणून काही पैसे द्यायला सांगितले आणि त्या बदल्यात त्याला टोकन म्हणजेच त्या ब्लूप्रिंट्स पाठवल्या. म्हणजे आता खरेदीदार कोण हे देखील कळले आणि ह्या सर्व कटात कोण कोण सहभागी आहे हे देखील. तथापि अद्याप प्रोटोटाईप कुठे आहे आणि तो कसा मिळवता येईल ह्याची काहीच माहिती नव्हती . इन्स्पेक्टर कदम यांनी विश्वजीतला सॅमन्था घरी नसल्याची बातमी दिली तेंव्हा त्याने निकीविषयी सांगितले. कदम नी घाईने निकीच्या घराकडे साध्या वेशातील पोलीस पाठवले तेव्हा निकीदेखील घरी नसल्याचे कळले आणि त्याचा पण फोन स्विच ऑफ येत होता. ह्यावरून सॅमन्था आणि निकी हे सोबतच कुठे तरी पळून गेले असावेत असा संशय इन्स्पेक्टर कदमना आला . तपास पुढे सरकत होता पण अजून प्रोटोटाईप कुठे आहे ह्या विषयीची काहीच माहिती मिळत नव्हती. 

इतक्यात दिल्लीवरून इन्सपेक्टर कदम यांना  फोन  आला. श्री भट यांनी तपासाच्या प्रगतीची चौकशी केली. चोर कोण आहेत हे कळल्याचे समजताच त्यांना खूप आनंद झाला पण प्रोटोटाईपविषयी अजून काही माहिती नाही हे कळताच त्याचा स्वर थोडा चिंतेचा झाला . Time is of essence inspector , असे म्हणून त्यांनी विश्वजीतला फोन द्यायला सांगितले. विश्वजीतला त्यांनी आतापर्यंतच्या कामासाठी शाबासकी दिली आणि लवकरात लवकर प्रोटोटाईपचा शोध लाव , तुला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल ती मिळेल असे सांगितले. विश्वजीतने त्यांचे आभार मानून पुन्हा कामाला सुरवात केली.  आणि इतक्यात तिथे पाटील साहेब आणि शामकुमार देखील आले. शामकुमार ह्यांना आपली सिक्युरीटी इतकी तकलादू कशी , फ्रंट डेस्कच्या लोकांना प्रोटोटाईप पर्यंत जायला कशाला ऍक्सेस ठेवले, साधा फ्रंट डेस्क चा माणूस CCTV फुटेज डिलीट करतो म्हणजे काय ? फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का ? असे अनेक प्रश्न पडले होते पण वेळ तो विचार करण्याची नव्हती. प्रोटोटाईप परत मिळताच पूर्ण सिक्युरिटीची पुनर्रचना करण्याचे त्यांनी ठरवले.  

तर शेवटच्या मिळालेल्या धाग्यानुसार निकोलसने निकीला पैसे दिले होते त्यामुळे विश्वजीतने त्या दिशेने ऍनालिसिस ला सुरवात केली . मनी , बँक, क्रेडीटेड अश्या की वर्ड्सनी आणि निकोलसशी निकीचे बोलणे झाले त्या कालावधीच्या आसपासचे त्याने निकीचे इमेल्स शोधायला सुरवात केली आणि बिंगो ..... बँक ऑफ बेस्टोनिया कडून निकीच्या अकाउंट मध्ये साधारण १,०००,००० डॉलर्स जमा झाल्याचा ई-मेल त्याला मिळाला. त्याने ही बातमी लगेच इन्स्पेक्टर कदम यांना सांगितली आणि बँक ऑफ बेस्टोनियाशी तात्काळ संपर्क करून देण्याविषयी सुचवले . कदम यांनी श्री भट यांना फोन लावला आणि लगेच चक्रे फिरली . बँक ऑफ बेस्टोनिया मधील एका बड्या पदाधिकाऱ्यांशी विश्वजीतचा फोन जोडून देण्यात आला . विश्वजीतने त्या १,०००,००० डॉलर्स च्या व्यवहाराविषयी चौकशी केली तर ते निकीच्या नवीनच उघडलेल्या अकाउंट मध्ये अमुक अमुक तारखेला जमा झाले आहेत असे त्या अधिकाऱ्याने सांगितले . विश्वजीतने ह्या खात्याविषयी इतर माहिती विचारताच हे कळले कि बेस्टोनिया देशातमध्ये निकीने बीच हाऊस विकत घेतले आहे आणि त्यासाठी निकीने बँकेकडून ५,०००,००० डॉलर्स चे गृह कर्ज घेतले आहे.  विश्वजीतने त्या अधिकाऱ्याचे आभार मानून फोन ठेवला आणि त्याच्या लक्षात आले कि निकी आणि सॅमन्था बेस्टोनियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असू शकतील आणि त्याने लगेच एअरपोर्ट ऑथोरोटी ऑफ इंडियाकडे भारतातून बेस्टोनिया ला जाणाऱ्या गेल्या २ आठवड्यापासून ची आणि आजची अशी प्रवाशांची यादी पाहून त्यात निकी आणि सॅमन्था चे नाव आहे का हे पाहायला सांगितले. श्री भट ह्यांच्या प्रभावामुळे लगेच उत्तर आले आणि त्यात असे कळले कि आजच्या सकाळच्या मुंबई - बेस्टोनिया विमानात ह्या दोघांचे आरक्षण होते. विश्वजीतने लगेच मुंबई एअरपोर्टला फोन लावला आणि एअरपोर्टच्या अधिकाऱ्याकडून उत्तर आले कि विमानाने कधीच टेक ऑफ केला आहे आणि आता विमान भारतीय हवाई हद्दीच्या बाहेर आहे त्यामुळे ते आता काहीच करू शकत नाहीत . हे कळताच इन्स्पेक्टर कदम यांची भयंकर चिडचिड झाली. जवळ जवळ हातात आलेली केस आता निसटून जाते कि काय असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पुन्हा श्री भट यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. श्री भट यांनी मी पाहतो काय करता येत ते, अस सांगून फोन ठेवला. पुढील ३० मिनिटे कदम, पाटील आणि विश्वजीत साठी अतिशय तणावपूर्ण गेली. विश्वजीतने जितकं करता येईल तितकं सगळं केलं होतं , आता सगळं श्री भट काय करतात ह्यावर अवलंबून होतं . खोलीत कोणीच काही बोलत नव्हतं , एकमेकांचे श्वास ऐकू येतील इतकी शांतता ! आणि इतक्यात इन्स्पेक्टर कदमचा फोन वाजला . त्यांनी घाई घाईनी तो उचलला आणि त्यांच्याभोवती पाटीलसाहेब , विश्वजीत, शामकुमार ह्यांनी गर्दी केली. सगळेजण श्री भट कदम ह्यांना काय सांगत आहेत ह्याकडे प्राण कानात ओतून ऐकू लागले. श्री भट यांनी एक ई-मेल ऍड्रेस दिला आणि विश्वजीतला प्रोटोटाईपच्या ब्लूप्रिंट त्या ई-मेलवर पाठवायला सांगितले आणि फोन ठेवून दिला . विश्वजीतने लगेच ते पाठवले आणि सगळे जण आता अधीर होऊन पुढे काय होणार ह्याची वाट पाहू लागले. श्री भट ह्यांनी नक्की काय केले, आता पुढे काय होणार ह्याची काहीच कल्पना नसल्याने वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले. अशीच काही मिनिटे गेली आणि थोड्या वेळात पुन्हा इन्स्पेक्टर कदम यांचा फोन वाजला. निकी आणि सॅमन्था ह्यांना बेस्टोनिया पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्या कडून प्रोटोटाईप देखील जप्त केला . सगळ्यांनी आनंदाने हुर्रे असे ओरडायला सुरवात केली. मनावरचा सगळं ताण अचानक कमी झाला होता. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले होते. श्री भट ह्यांनी बेस्टोनियातील भारतीय वकिलातीकडून निकी आणि सॅमन्थासाठी वॉरंट जारी केले होते आणि तिथल्या पोलिसांना प्रोटोटाईपचे फोटो पाठवून तो प्रोटोटाईप निकी / सॅमन्था ह्यांच्या सामानात शोधायला सांगितला होता . बेस्टोनिया पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि बेस्टोनिया एअरपोर्टवरच निकी आणि सॅमन्थाला अटक केली , सामानाच्या झडतीमध्ये तो प्रोटोटाईप मिळाला !

यथावकाश निकी आणि सॅमन्थाला भारतात आणलं आणि चौकशीत निकीने गुन्हा कबूल करत सांगितलं कि हा सर्व त्याचा प्लॅन होता. निकोलसकडून विचारणा झाल्यावर हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला सॅमन्थाची मदत घ्यावी लागली. अर्धी रक्कम देण्याच्या बोलीवर सॅमन्था तयार झाली .  सॅमन्था तांत्रिकदृष्या प्रवीण होती आणि तिने ह्या कामासाठी संदीपला तयार करण्याचे ठरवले. प्रथम निकोलसचा विश्वास संपादित करण्यासाठी सॅमन्थाने ब्लूप्रिंटचे फोटो काढले.  ते एनक्रिप्ट करून आपल्या कॉम्पुटरवरून निकीला पाठवले आणि निकीने ते निकोलसला पाठवले आणि सॅमन्थाने फोनवरून निकोलासला ते कसे  बघायचे हे सांगितले . निकोलसने खूष  होऊन ठरलेले पैसे निकीला पाठवले आणि प्रत्यक्ष प्रोटोटाईपसाठी डील फायनल केले . सॅमन्थाने मग तिच्या कॉम्पुटरवरील ते एनक्रिप्ट केलेले फोटो ज्या बिटलॉकरने एनक्रिप्ट केलेल्या पार्टीशन वर होते त्या पार्टीशनची की युसबीवर कॉपी केली आणि ते पार्टीशन डिलीट केले . एन्क्रिप्शन सॉफ्टवेअर Truecrypt  देखील uninstall केले .बिटलॉकर पार्टीशनची की युसबी मध्ये होती पण बेस्टोनियाला जायचा प्लॅन झाल्यावर तिने तो युसबी आपटून नष्ट करायचा प्रयत्न केला, त्यात युसबीचे बाहेरचे कव्हर तुटले , कंपनीतून बाहेर जाताना तिने घाई घाईत तो युसबी ट्रॅशमध्ये टाकला आणि ती निघाली. चोरी झाल्यावर तो प्रोटोटाईप संदीपकडून घेऊन ती निकीला ठरलेल्या ठिकाणी भेटली आणि तिथून दोघांनी एअरपोर्ट कडे प्रयाण केले . जसे विमान सुटले आणि भारतापासून लांब लांब गेले तसे दोघांनी विमानात चिर्स केले आणि भविष्याची स्वप्ने पाहू लागले . बेस्टोनियात लँड होताच त्यांना वाटले कि आपण बाजी जिंकली, परंतु भारत सरकार , महाराष्ट्र पोलीस आणि विश्वजीतसारखे लोक हे देशासाठी काय करू शकतात ह्याची त्यांना कल्पना नव्हती . लँड होताच  पाहतात तर काय, बेस्टोनिया  पोलीस त्यांच्या स्वागतासाठी उभे ! तिथून पुढे काय झाला हे सर्वांना माहितीच आहे.

पुढे निकोलसच्या नावाने वॉरंट निघून त्यालाही अटक करण्यात आली आणि ह्या पूर्ण प्रकरणावरती पडदा पडला. विश्वजीत आणि त्याच्या डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने आणखी एक गुन्हा उघडकीला आला होता आणि देशाचे फारसे नुकसान न होता गुन्हेगार जेरबंद झाले होते. इन्स्पेक्टर कदम ह्यांचा जित्या आता डिटेक्टिव्ह विश्वजीत झाला होता ! 

Sunday, June 26, 2016

हे असं का ? concept of monality vs duality

आज जागतिकीकरणाच्या युगात अनेक जण आज पूर्वेकडील देशातून पश्चिमेकडील देशात आणि पश्चिमेकडील लोक पूर्वेकडच्या देशात विविध कारणामुळे येतात. अश्या वेगळ्या देशात आल्यावर आपल्याला अनेक फरक जाणवू लागतात. भौगोलिक, हवामान , भाषा इ. तर आहेच पण सर्वात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक फरक. ह्यात देखील पेहराव किंवा फ़क़्त दिखावू गोष्टींपलीकडे जाऊन विचार केला तर असं प्रश्न पडतो की हे असे का ?
उदाहरणार्थ : पश्चिमेकडील अमेरिका आणि पूर्वेकडील भारत घेऊ. त्यातही मुख्यत्वे ख्रिस्चन आणि हिंदू विचारसरणी ह्या संबंधी विचार करू.
अमेरिकेत जेवणाची पद्धत म्हणजे प्रथम starters मग maincourse मग dessert . त्यातपण शेफने जे बनवल असेल ते जवळ जवळ तसंच खावं लागता काही फार बदल न करता. फार फार तर तुम्ही वरून, मीठ, चीज किंवा pepper घेऊ शकता. पण standardization कडे कल असतो. जेवणाच्या सुरवातीलाच dessert कोणी खात नाही. हीच खायची योग्य पद्धत आहे असे लहानपणापासून बिंबवले जाते किंवा असेच जेवण जेवले पाहिजे. (This is the right way to satisfy your hunger)
उलट भारतीय थाळी घ्या. प्रथम गोड खा किंवा तिखट खा किंवा कोशिंबीर (सलाड ) खा किंवा इतर काही. तुमची मर्जी. रोटी भाजी बरोबर खा, दाल बरोबर खा , तीच दाल भाताबरोबर खा. हवं ते combination करा तुम्हाला आवडेल असं. मग एखादा भातात थोडी भाजी , थोडी दाल घेऊन खाईन तर दुसरा फ़क़्त भात आणी दाल खाईल, तिसरा आणखी कुठल्या पद्धतीने. बर आणी तीच चव पुन्हा येईल असं नाही. कारण कुठली गोष्ट किती प्रमाणात मिसळली आहे हे प्रत्येक जण आप आपल्या चवीनुसार ठरवतो. standardization नाही, तुम्हाला हव तसं , आवडेल तसं खा. इथे काय पदार्थ खाल्ले जातात हा मुद्दा नसून खाण्याची पद्धत हा मुद्दा आहे. (There is no right or wrong way, you decide your own way to satisfy your hunger)
आणखी एक उदाहरण , आपण पुस्तकांना पाय लागला तर नमस्कार करून क्षमा मागतो पण अमेरिकेत असं काही नाही. इथे कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा नसून हे असं का हा मुद्दा आहे.
शाकाहार आणि मांसाहार हा तर अनादी काळापासून चर्चेचा मुद्दा आहे. सध्या जवळ जवळ सगळेच सर्व प्रकारचे पदार्थ खातात पण भारतात अजूनही मुक्या प्राण्यांना मारून खाणे बरोबर नाही असा मतप्रवाह आहे पण अमेरिकेत असं काही नाही. हवामान आणि अन्नाची उपलब्धतता हा वेगळा मुद्दा पण प्राण्यांना मारण्यावरून हा विचारांमधील फरक का ?
पाश्चात्य देशातील कोणतीही कंपनी घ्या. Company vision > Mission > Goals > Objectives अशी संगती दिसेल. Company vision म्हणजे promised land जिथे जाण्यासाठीचे अमुक अमुक नियम. हे नियम पाळा म्हणजे तुम्ही तिथे पोहोचाल. ह्याउलट आपल्याकडे असं काही का काही नव्हतं ?
तर हे असं का ह्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते कि एका विचारधारेतून एक तत्व जन्माला येते . माणसाचा ह्या तत्वावर विश्वास असतो आणि त्या विश्वासामुळे तो ठराविक पद्धतीचे आचरण करतो. Philosophy leads to beliefs and Belief leads to behavior . हा विश्वास हा माणसाची जडण घडण कशी झाली आहे ह्यावर अवलंबून असतो. ह्या जडण घडणीमध्ये लहानपणीचे संस्कार, अनुभव , वाचन , आजूबाजूची माणसे व त्यांचे विचार ह्यांचा वाटा असतो. वरील सर्व उदाहरणांमध्ये आचरणातील फरक दिसून येतो याचा अर्थ आपल्या आणी इतर लोकांच्या विश्वासात फरक आहे. म्हणजेच आपण जी तत्वे मानतो ती पाश्चिमात्य लोक जी तत्वे मानतात त्यापेक्ष्या वेगळी आहेत. तत्वे वेगळी आहेत कारण ज्या मूळ विचारधारातून ह्या तत्वांचा उगम झाला आहे त्या विचारधाराच भिन्न आहेत . आणी त्या 2 भिन्न विचारधारा म्हणजेच concept of monality vs duality !
Monality म्हणजे मी आणि ईश्वर एकचं आहे. अहम ब्रम्हास्मि. तुझ्यातही देव आहे आणी माझ्यातही आहे. तसाच तो इतर सर्वत्र आहे. प्राणी, झाडे इ. सजीव ह्याचबरोबर वह्या पुस्तके ह्यांना देखील देवाचे (सरस्वतीचे ) रूप मानले आहे. ह्याच बरोबर जन्म मृत्यूचे चक्र असून ह्यातून मुक्ती मिळवणे हेच अंतिम ध्येय आहे अशी विचारधारा आहे. याचाच अर्थ स्वर्ग आणी नर्क येथे तुम्ही काही काळापुरते राहता आणि पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात अडकता मोक्ष मिळेपर्यंत.
Duality म्हणजे देव (God )आहे ज्याने त्याचा दूत (Son of God) मनुष्यरुपात पृथ्वीवर पाठवला (Jesus) आणि त्याने नियम घालून दिले जे पाळल्याने आपण स्वर्गात (promised land) कडे जाऊ. म्हणजेच देव आणी त्याचा मनुष्यरुपात असलेला दूत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देवाने मनुष्याला विशेष क्षमता दिल्या आहेत, म्हणून तो इतर प्राण्यांच्यापेक्ष्या वरच्या स्तरात (superior) आहे . त्यामुळे आपल्याला मिळालेल्या किंवा देवाने दिलेल्या क्षमता वापरून जर आपण काही केले तर ते चालते हा समज आहे. त्याच बरोबर हा एकचं जन्म असून शेवटी आपण मिळवलेल्या गोष्टींवरून (sum of achievements) आपल्याला स्वर्ग (place of hero's)किंवा नर्क येथे कायमचे स्थान मिळते.
Duality नुसार जन्म हा एकचं आहे त्यामुळे जे काही करायचे ते परफेक्टच. 10 commandments नुसार तुम्ही हे नियम पाळा म्हणजे तुम्हाला स्वर्गात (promised land) कडे जाता येईल असे सांगितले आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बरोबर किंवा चूक, योग्य किंवा अयोग्य अश्या मध्ये वर्गीकरणाची वृत्ती दिसते. ह्या उलट Monality मध्ये देव तुझ्यातच आहे त्याचा शोध तुला स्वतःलाच घ्यायचा आहे असे सांगितले आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत अनेक जन्म घ्यावे लागतील. म्हणजेच आपण स्वतच ठरवायचे कि आपण कोणता मार्ग निवडायचा. ज्याने असं आवडेल तसा निवडावा. कोणी जंगलात जाऊन साधना करा , कोणी देवळात जाऊन करा, कोणी सर्वांबरोबर एकत्र प्रार्थना करा, कोणी घरच्या घरी करा. एक फॉर्म्युला नाही ज्याला जस आवडेल तस करा. शेवटी ध्येय एकचं. अश्या प्रकारे विचारधारेतून तत्व किंवा विश्वास तयार होतो. आणि त्यावरून माणूस स्वतःची वर्तणूक ठरवतो.
एकदा आपण हे सर्व समजून घेतलं की आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आत्ता पुन्हा वरील उदाहरणे पाहू.
१. जेवायचा हीच योग्य पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला जेवल्याचे समाधान मिळेल आणि याउलट तुम्हाला हव तसा जेवा, आवडेल तसे जेवा कारण तुमचा समाधान हे तुम्हीच शोधून काढायचा आहे तुम्हाला आवडेल त्या मार्गाने. इथे कोणताही एकचं योग्य मार्ग नाही.
२. पुस्तक म्हणजे सरस्वतीचे रूप. त्याला पाय लागला तर क्षमा ही मागितलीच पाहिजे. हाच भाव आपण जमिनीला पाय लावतो म्हणून जमिनीची किंवा पृथ्वीची क्षमा मागून दिवसाची सुरवात अनेकजण करतात. या उलट मनुष्याला देवाने बुद्धी दिली आहे आणी त्याचा वापर करून त्याने बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या त्यामुळे त्या गोष्टींपेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. ज्ञान हे माणसाच्या डोक्यात आहे पुस्तक हे फ़क़्त माध्यम आहे माणसानेच निर्माण केलेलं.
३. देव माझ्यात आहे तसाच प्राण्यातही आहे. त्यामुळे प्राणी मारणे योग्य नाही याउलट देवाचा दूत हा माणूस होता म्हणजे माणूस हा देवाला इतर प्रजातीन्पेक्ष्या प्रिय असून त्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जगातील इतर गोष्टी ह्या माणसाच्या उपभोगासाठीच आहेत. त्यामुळे इतर प्राण्यांना खाणे यात गैर काहीच नाही. ह्यात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नसून हे असं का हा आहे .
४. जन्म एकाच आहे त्यामुळे सर्व काही ताबडतोब झाले पाहिजे, ह्याच पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे पूर्वीपासून तुम्ही ह्या जन्मात काहीतरी heroic असा केला पाहिजे तरच शेवटी तुम्हाला Elysium मध्ये म्हणजे अशी जागा जिथे देव सगळ्या hero किंवा ज्याने आयुष्यात काही तरी करून दाखवलंय अश्यांना स्थान देतो. या उलट आपल्याकडे एक नसून अनेक जन्म घ्यावे लागतात अशी विचारधारा आहे. त्यामुळे कमावलेले सगळे इथेच सोडून जायचे आहे , सोबत येतील ती फ़क़्त आपली कर्मे, त्यामुळे ह्या चक्रातून मुक्त व्हायचे असेल तर चांगली कर्मे करा. अनाठायी खर्च करू नये, कारण आपला जन्म कदाचित पुन्हा ह्याच घरात होऊ शकेल .
देवदत्त पटनाईक ह्यांनी ह्या बाबतीत एक छान किस्सा सांगितला होता. जेव्हा सिकंदर भारतावर स्वारी करणार होता त्या आधी त्याचा डेरा भारताच्या सीमेवर होता . सिकंदरला अनेक विजय तोपर्यंत मिळाले होते आणि त्याची इच्छया जग काबीज करायची होती. असाच तो एकदा रात्रीच्या वेळी आपल्या घोड्यावरून फेरफटका मारत असताना त्याला एक उघडा नागडा माणूस तळ्याकाठी आकाशाकडे बघत असलेला दिसला. त्याने त्या माणसाला विचारले कि तू काय करतोय ? तेव्हा त्या माणसाने उलट सिकंदरला विचारलं , तू काय करतोय ? तेव्हा सिकंदर म्हणाला मी इथे जग काबीज करतोय. तू काय करतोय ? तर तो माणूस म्हणाला मी स्वतःला काबीज करण्याचा प्रयत्न करतोय . आणी एवढे बोलून दोघेही हसायला लागले . हसण्याचं कारण ? पहिल्याला वाटला दुसरा मूर्ख आहे आणी दुसर्याला वाटला पहिला मूर्ख आहे. इथे मूर्ख खरतर कोणीच नाही. हा दोन विचार्धारामधील फरक त्यांच्या वर्तणुकीतून जाणवत होता. सिकंदरला वाटल, हा काय वेळ वाया घालवत बसलाय काहीही न करता ? ह्याचा जन्म हा फुकट घालवणार आणि त्या माणसाने विचार केला , जग जिंकून काय करणार? सगळ सोडून जायचं एक दिवस आणि स्वतःचा शोध नाही घेतला तर परत ह्या जन्म मृत्युच्या चक्रात फिरायचं, जग जिंकण्यात हा ह्याचा जन्म वाया घालवत आहे.
आता आपल्याला कळू शकेल की पाश्चात्य orchestra ला नोट्स आणी conductor का असतो (right way, follow the rule) आणि भारतीय संगीतात conductor नसतो . कलाकार त्याला रुचेल अश्या पद्धतीने वाजवतो (follow your own way) आणी त्यामुळेच पाश्चात्य संगीतातला performance ची पुनरावृत्ती होऊ शकते पण एखाद्या गायकाने अगर तबलजीने एखादी तान किंवा तुकडा हा एकमेवाद्वितीय असतो. त्या कलाकाराला देखील तसाच performance परत देत येइलच ह्याची १००% हमी नाही.
अमेरिकेतही पूर्वी शेतीसाठी बैल वापरले जायचे आणि भारतात तर आजही वापरले जातात पण बैल पोळा आपल्याकडेच का ?
पाश्चात्य उत्तर हो किंवा नाही , बरोबर किंवा चूक आणि आपल्याकडे असू शकेल (may be) व त्यातून उगम पावलेलं famous indian head shake ... पाश्चात्य लोक ह्यामुळे गोंधळतात ते का, ते आपल्याला आता कळेल आणि भारतीय लोक मुद्दाम असं करत नाहीत, ते नकळत होत, ते का हे सुद्धा आता लक्ष्यात येईल.
कोणी म्हणेल हे सगळं जाणून घेऊन मला काय करायचं ? मला काय उपयोग ह्या असल्या गोष्टींचा ?
उपयोग आहे, नक्की आहे. जेव्हा तुम्ही ह्या दोन विचारधारा समजून घ्याल तेव्हा तुम्हाला कळू लागत कि समोरचा माणूस एका विशिष्ठ प्रकारे का वागत आहे ? आणी हे जाणून घेतल्याने आपण स्वतःच्यात आणी दुसर्या व्यक्तीतील फरकाचा आदर करू लागतो . माझे बरोबर तुझे चूक किंवा आपला मुद्दा ठासून सांगायची वृत्ती संपते कारण तुम्हाला लक्षात येत की कोणीतरी बरोबर किंवा चूक नाहीये. तर दोन वेगळ्या विचारधारांना मानणारे हे लोक असून दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत. हे जेव्हा आपल्या लक्षात येत तेव्हा जगण्यातली खरी गंमत कळू लागते.
टीप : ह्या लेखातील काही विचार देवदत्त पटनायक ह्यांच्या कर्तायात्रा ह्यावरून प्रेरित आहेत.

भारतीय प्रसारमाध्यमे आणी विश्वासार्हता

लेखाच्या सुरवातीलाच नमूद करू इच्छितो की हे माझे वैयक्तीक विचार असून लेखाच्या शेवटी घेतलेला निर्णय हा मी माझ्यापुरता घेतलेला आहे.
९० च्या दशकापर्यंत बातम्या मिळवण्यासाठी दूरदर्शन/आकाशवाणी हे एकमेव साधन होते. संध्याकाळी ७ च्या मराठी बातम्या माझे वडील न चुकता पहायचे आणी अजूनही पाहतात. त्या बातम्यांना एक दर्जा होता आणी मुख्य म्हणजे कुठलीही सनसनी निर्माण करणे हा उद्देश नसायचा. पण आज काय स्थिती आहे ? २४ तास दळण दळल्यासारख्या News चानेल्स सुरु आहेत. दर्जाच्या नावानी तर बोम्ब ! कित्येकवेळा १ ओळीची बातमी आणी २० सेकंदांचे फुटेज परत परत परत परत एकदा active voice एकदा passive voice मध्ये सांगून आणी फुटेज repeat मोड वर लावून अर्ध्या तासाचा exclusive प्रोग्राम करतात. उदाहरण : "हे बघा ते येत आहेत " …… परत थोड्या वेळानी " हे पहा ते आपल्याला येताना दिसत आहेत " …… परत थोड्या वेळानी … " फ़क़्त आमच्या channel वरतीच यांना येताना दाखवण्यात येत आहे" …. अरे काय लावलंय ? काही तरी दर्जा ?
पण लेखाचा उद्देश हा नाही, मुद्दा हा आहे की पत्रकारांच काम पूर्ण आणी खऱ्या बातम्या देणे हे आहे. पण आज तसे दिसतं नाही. आपण काही उदाहरणे पाहुयात :
१. १६ एप्रिल २०१५ : कॅनडाने भारतीयांना वीसा ओन arrival ची घोषणा केली
video नीट पाहिला तर इंग्लिश येणाऱ्या कोणालाही कळेल की कॅनडाच्या लोकांसाठी भारताचा हा वीसा ओन arrival प्रोग्राम आहे. Times of India आणी कित्येक अनेक माध्यमांनी ही चुकीची बातमी exclusive च्या नावाखाली रिपोर्ट केली. ह्यामुळे पुढे काही वेगळे पेच निर्माण झाले तर मेडिया जबाबदारी घेणार का ?
२. मुस्लिम तरुणीला मुंबईत घर नाकारले : पोलिसांनी पूर्ण तपास केल्यावर ह्या बातमीत कोणतेही तथ्य आढळले नाही. त्या इमारतीत अनेक मुस्लिम राहत होते .
ह्या बातमीमुळे जर समाजात तेढ निर्माण झाली आणी त्यातून काही दंगे आणी नुकसान झाल तर त्याला कोण जबाबदार ?
३. जसलीन कौर प्रकरण : The “Pervert” who “molested” Jasleen Kaur अश्या मथळ्याखाली बातम्या प्रसिध्द झाल्या. सत्य काय आहे हे न तपासता एखाद्याला गुन्हेगार म्हणून घोषित करून तसा अख्या जगाला सांगायचं. अनेक प्रत्यक्ष दर्शी लोकांनुसार असे काहीही घडले नाही. न्यायदान केल्यासारख त्या बातमीवर निकाल देणे हे news channels चं काम नाही त्यासाठी न्यायालये आहेत. इथे त्या मुलाने बदनामीला कंटाळून स्वतःचं काही बर वाईट करून घेतलं तर एका मुलाचा आयुष्य हकनाक उध्वस्त केल्याची media जबाबदारी घेणार का ?
४. section १२४ अ : Breaking Now: Maharashtra govt issues draconian diktat. 'Sedition charges for criticising state, central govt.'
पण खरी गोष्ट अशी नाहीच आहे. ज्यांना हवा असेल तर महाराष्ट्र सरकारचे मूळ पत्रक इथे वाचू शकतात :
ह्यात स्पष्ट लिहिले आहे की ज्यामुळे समाजात हिंसा , द्वेष पसरेल असे वाटेल तेव्हाच हे कलम लावण्यात यावे. ह्यात काय चुकीचे आहे ? media नि कसही बेताल reporting करायचं , वाट्टेल त्या बातम्या खर्याची शहानिशा न करता द्यायच्या आणी ह्यामुळे हिंसा आणी द्वेष पसरला तर कारवाई झाल्यास आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बुडाले म्हणून गळे काढायचे ? म्हणजे ह्यांना अधिकार मात्र हवा पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मात्र नको. ह्या चुकीच्या बातम्या दिल्याबद्दल एका तरी चानेल ने दिलगिरी व्यक्त केलीये का ? एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर आणून त्या जगाला दाखवायच्या, तेव्हा आपण एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतो हे कळत नाही आणी अश्या बेताल वागणुकीसाठी सरकारने नियम केला की लगेच कोल्हेकुई सुरु.
५. अजित डोवल हे पंतप्रधानाच्या एका दौर्यातील convoy मध्ये होते. ते दौरा सोडून अचानक भारतात परत आले. आपल्या माध्यमातील सो called expert लोकांची लगेच बडबड सुरु झाली . हे आंतरराष्ट्रीय संकेताच्या विरुध्द आहे, हा त्या दुसर्या देशाच्या सरकारचा अपमान आहे ,पंतप्रधानांनी अशी परवानगी दिलीच कशी ? फलाना ठिकाणा … दिवसभर तेच दळण दळत बसले होते , थोड्या दिवसांनी भारतीय सैन्यांनी operation म्यानमार केलं जिथे म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणी operation planning मध्ये मुख्य होते अजित डोवल ! आपण ह्या माणसाबद्दल काही दिवसांपूर्वीच किती वीष पसरवत होतो हे विसरून भारतीय सैन्याचं गुणगान सुरू , गुणगान अवश्य करा पण आपण आधी जी घाण केली ती साफ कोण करणार ?
६. अनुराग कश्यपनी टाकलेल्या tweat वर कोणतीही शहानिशा न करता भारतीय माध्यमांनी इतक्या कहाण्या report केल्या आणी शेवटी कळलं की अनुराग कश्यप नी डोळ्यांसाठी prosthetics test केली आणी त्याचा तो फोटो होता. इतकी चुकीची बातमी दिवसभर मीठ लावून सांगितल्याबद्दल एकही माध्यमांनी दिलगिरी व्यक्त केली नाही
भारतीय प्रसारमाध्यमांच्या double standard चा खरोखर वीट आलाय आणी माझ्या लेखी तरी ही सर्व भारतीय माध्यम त्यांची विश्वासार्हता गमावून बसले आहेत. काही माध्यमे चांगली असतील ही पण ओल्या बरोबर सुक जळले तसा हा काहीसा भाग आहे . आणी त्यामुळे मी माझ्या पुरता असा निर्णय घेतलाय की भारतीय माध्यमातील कोणतीही बातमी ही विदेशी माध्यमातील बातमीबरोबर जुळत असल्यासच त्या बातमीवर विश्वास ठेवायचा. आणी पूर्वी होतं तसं फ़क़्त दूरदर्शनच्याच संध्याकाळच्या बातम्या बघायच्या. आवश्यक ती बातमी आवश्यक त्या प्रमाणात कळते आणी तेही अर्ध्या तासात !

अमेरिकेतील काही भारतीयांचे अनुभव

इथे मी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आलेले भारतीय लोकांचे अनुभव मांडत आहे :
---------------------------------------------------------------
१.
एकदा मित्राला आणायला न्यूयॉर्क विमानतळावर गेलो होतो. मित्राला रेसिव करून taxi stand वर आलो आणि एका taxi मध्ये बसलो. योगायोगानी taxi driver पंजाबी होता. त्याच्याशी हिंदी मधून गप्पा मारायला सुरवात केली. सुमारे तासाभरानी आम्ही पोहोचलो. मित्राचे घर तिसर्‍या मजल्यावर आहे (लिफ्ट नाही). आम्ही उतरल्यावर त्या सरदार driver ने स्वतःहुन bags वर आणून दिल्या. त्या बद्दल त्याला जास्तीचे पैसे देवू केले तर ते त्यानी नाकारले आणि म्हणाला "ओये अपणे भाई के वास्ते किया यार" आणि आपले कार्ड देवून निघून गेला.
२.
मी व बायको एकदा एका indian store मध्ये गेलो जे फ़क़्त पूजा सामानासाठी प्रसिद्ध आहे. त्या दुकानाचा मालक गुजराती. तिथे जवळ जवळ सर्व पूजा सामान मिळाले फ़क़्त गेजावस्त्र सोडून. आम्ही त्याला त्या बद्दल विचारलं तर त्याला गेजा वस्त्र म्हणजे काय ते माहित नव्हतं. आम्ही थोडं वर्णन केल्यावर त्यांनी लगेच त्याची डायरी काढली आणि त्यात गेजा वस्त्र अशी नोंद केली. स्वतच्या फोन वर लगेच गूगल करून ही काय वस्तू आहे ते पाहिलं आणि लगेच स्वतःचं कार्ड देऊन म्हणाला "१५ दिन के बाद फोन करो अगर उसे पहिले आता हे तो मै आपको बता दुंगा, आप अपना नंबर दो ".
३.
एका दुकानात गेलो होतो जे खास महाराष्ट्रीयन वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. तिथे भाजणीचे पीठ, मेतकूट, कांदा लसूण ठेचा आणि बर्‍याच इतर महाराष्ट्रीयन वस्तू मिळतात. त्याचा मालक महाराष्ट्रीयन आहे. पण तिथे त्याला जे विचारू त्याचं १ किंवा २ शब्दात उत्तर आणि तेही चेहर्‍यावरची रेषही न हलू देता. जसा काही एखादा रोबो बोलत आहे. तो मराठी आहे म्हणून त्याच्याशी मराठीत बोललो तर उत्तर इंग्लिश मधून. मग मी इंग्लिश मधून बोललो तरी तेच … बहुतेक ह्याला शाळेत असताना एका शब्दात उत्तरे द्या हा खूप भाग आवडता होता की काय असं वाटून गेलं.
उदा: तुमच्याकडे भाजणीच्या चकल्या आहेत का ? उत्तर :- by order only.
I need to place the order. उत्तर:- उत्तर म्हणून त्याने त्याचे कार्ड दिले ज्यावर लिहिले होते to order send email toxxxxx@xxx.com आणी त्या इमेल वर बोट ठेवून ते tap केल. तोंडातून काहीही उत्तर नाही.
--------------------------------------------------------
तीन माणसे, तीनही भारतीय पण गिऱ्हाइकाशी वागायची पद्धत ही त्यांच्या मानसिकतेबद्दल बरच सांगून जाते. पहिल्या दोघांना माझाकडून repeat business आणि तिसर्‍याला bad mouth publicity मिळाली ह्यात आश्चर्य ते काय ?

पुराणातील वांगी ?

आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?
आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया :
अ : अणूबॉम्बचा शोध
ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!!
मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ?
अ : विमान
ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर.
मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ?
अ : प्रोग्रामिंग
ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे.
मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो.
अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र
ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी .
मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ?
मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले.
आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव

मी न्यूयोर्कमध्ये पोहोचल्यावर मित्राकडे आलो. तो त्याच्या roommates बरोबर राहायचा पण त्याचा roommate समर vacation साठी भारतात गेला होता आणी त्याच्या जागी माझी राहायची सोय झाली. मित्राच्या घरी पोहोचल्यावर गप्पा वगैरे झाल्या. मित्राला दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या universityमध्ये on -campus जॉबसाठी जायच असल्याने त्याने रात्रीच त्याच्याकडची घराची चावी मला दिली. जवळ जवळ २३ तासाचा सलग प्रवास झाला होता त्यामुळे मी खूप दमलो होतो आणि काहीही न खाता सरळ झोपून टाकलं.
दुसर्या दिवशी थेट सकाळी ११:३० वाजता जाग आली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. फ्रेश होऊन काहीतरी खायला म्हणून घराबाहेर पडलो. न्यूयोर्कमध्ये १-२ block चाललं कि अनेक हॉटेल्स दिसतात. माझी ही अमेरिकेत पहिलीच वेळ, त्यातून मी veg खाणारा. चालता चालता बरीच हॉटेल्स लागत होती पण आपल्याला कोणते चालेल हे काही नक्की कळत नव्हतं. न्यूयोर्कमध्ये summer सुरु होता. त्या रणरणत्या उन्हात चालून खूप तहान लागली होती. १५-२० मिनीट चालल्यावर शेवटी एके ठिकाणी veg falafel असा बोर्ड पाहीला आणी जवळ गेलो तर छान खमंग वास आला आणि मी सरळ त्या हॉटेल मध्ये घुसलो.
हॉटेल तस लहानच होतं, फ़क़्त ६-७ टेबल्स होती. तिथे एका टेबलवर जाऊन बसलो. माझ्या टेबलवर अर्धा लिटरची पाण्याची बाटली आधीपासूनच ठेवली होती. भारतात हॉटेलमध्ये गेलं की विचारतात साध पाणी की बिसलेरी? मला वाटला अमेरिकेत ही अशी पद्धत असेल की प्रत्येकाला बिसलेरीचच पाणी by default ! . मी ती सीलबंद बाटली उघडून घटाघटा पाणी प्यायलो. जवळ जवळ निम्मी बाटली संपवली. मग थोडं निवांत होऊन इकडे तिकडे पाहू लागलो तो बोर्ड दिसला - सेल्फ सर्विस ! मग मी उठून आतल्या बाजूच्या counter वर गेलो, ऑर्डर दिली. एवढ्यात प्यायलेल्या पाण्याने कामगिरी चोख बजावली आणी मी counter वरच्या माणसाला रेस्टरूम कुठे आहे ते विचारल. त्याने त्या दिशेला बोट दाखवलं आणि मी एका अंधार्या कोपऱ्यापाशी आलो. तिथे रेस्टरूमच्या दिव्याचे बटन होते ते मी खाली केले (लाईट सुरु होण्यासाठी ) आणी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण कोणीतरी आत होतं म्हणून मी तिथेच बाहेर वाट बघत थांबलो. थोड्या वेळात एक माणूस बाहेर आला आणि मला म्हटला " Did you turn the lights off when I was taking my dump?" च्यायला झाला का घोळ …. अमेरिकेत बटन वर म्हणजे लाईट चालू आणी खाली म्हणजे बंद ह्याचा आत्ता मला खुलासा झाला. lessons learned …. भारतात ह्याच्याबरोबर विरुद्ध आहे त्यामुळे माझा हा घोळ झाला. मी त्या माणसाला sorry म्हणून पटकन आत घुसलो. साधारण मिनिटभराने बाहेर आलो तेव्हा तोच माणूस मी ज्या टेबलवर बसलो होतो तिथे उभा राहून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. "Who the hell drank my water ?" म्हणजे ती पाण्याची बाटली त्याची होती !!!! मग माझे बाकीच्या टेबलकडे लक्ष गेलं आणी माझ्या लक्षात आलं की बाकीच्या कोणत्याही टेबलवर बाटली नाहीये. याचाच अर्थ अमेरिकेत अशी by default बिसलेरी वगैरे द्यायची काही पद्धत नाहीये .. lessons learned again …… मला अगदी शरमल्यासारखे झाले, मी त्या माणसाकडे जाऊन पुन्हा त्याला sorry म्हटलं आणी सांगितलं की मी ते पाणी प्यायलो आणी मी त्याचे तुम्हाला पैसे देतो. तो माणूस अतिशय वैतागून मला म्हटला " why are you after me man ? Why ? " असं म्हणत तरातरा तिथून निघून गेला. इतक्यात counter वरील माणसाने order तयार आहे असं सांगितलं पण आता इतका तमाशा तिथे झाल्यावर मला आता तिथे थांबण्याची बिलकुल इच्छया होत नव्हती. मी ते पार्सल घेऊन घरी यायला निघालो आणि मनात विचार आला …. " अमेरिकेत तुझ स्वागत आहे मित्रा …. आपण कितीही शिकलेले असू पण वेगळा देश, निराळी संस्कृती आपल्याला किती काही शिकवून जातात नाही ? "